जवळचे पिकनिक ठिकाणे

images

शिर्डी (साईबाबा मंदिर)( यश फार्म्स पासून साधारण ४५ कि मी अंतरावर )

हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हयातील राहता तालुक्यातले एक शहर आहे. इ.स.च्या १९च्या शतकाच्या उत्तरार्धात संत साईबाबांच्या वास्तव्यामुळे शिर्डी नावारूपास येऊ लागले. साईबाबांच्या पश्चात तेथे भक्तांनी उभारलेल्या साईबाबा मंदिरामुळे धार्मिक क्षेत्र म्हणून हे प्रसिद्धी पावले आहे.

अधिक वाचा...
images

शनी शिंगणापूर ( यश फार्म्स पासून साधारण ८५ कि मी अंतरावर )

अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीजवळ वसलेल्या एक प्रमुख आणि जागृत क्षेत्र म्हणून शनि शिंगणापूर हे संपूर्ण महाराष्ट्नला परिचित आहे. शनी मंदिरामुळे गावाच्या नावात शनी जोडले गेले. येथे शनिदेव स्वयंभू पाषाण रूपात विराजमान आहेत. येथे श्रीशनैश्वराचे स्वयंभू जाज्वल्य देवस्थान असून शनैश्वराची मूर्ती ५ फूट ९ इंच उंचीची आहे.

अधिक वाचा...
images

भंडारदरा धरण ( यश फार्म्स पासून साधारण १०० कि मी अंतरावर )

भंडारदरा हे गाव भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात आहे.येथे भंडारदरा धरण आहे. या गावाजवळ जलविद्युत केंद्र आहे. भौगोलिक अक्षांश- १९० ३१’ ४” उत्तर; रेखांश ७३० ४’ ५”पूर्व. भंडारदरा (शेंडी) हे प्रवरा नदीच्या काठी वसलेले एक आदिवासी कोळी महादेव जमातीचे गाव आहे.

अधिक वाचा...
images

रंधा फॉल्स ( यश फार्म्स पासून साधारण ९० कि मी अंतरावर )

शेंडी या गावापासून १० किलोमीटर अंतरावर रंधा या गावात एक विशाल धबधबा असून तो गावाच्या नावावरूनच रंधा फॉल म्हणून प्रसिद्ध आहे. सध्या हा धबधबा त्यावर असलेल्या जलविद्युत प्रकल्पामुळे फक्त पावसाळ्यातच पहायला मिळतो. पावसाळ्यात हा धबधबा अतिशय रौद्र रूप धारण करतो.

अधिक वाचा...
images

कळसुबाई शिखर( यश फार्म्स पासून साधारण ९५ कि मी अंतरावर )

कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वांत उंच पर्वतशिखर आहे.समुद्रसपाटीपासून त्याची उंची ५४०० फूट म्हणजे सुमारे १६४६ मीटर आहे. या गावापासून कळसूबाई शिखरावर जाण्याचा मार्ग आहे. शिखरावर कळसुबाई देवीचे एक छोटे मंदिर आहे. देवीची अख्याइका सांगितली जाते कि, कळसुबाई हि तेथील गावातील सून होती.

अधिक वाचा...
images

हरिश्चंद्रगड ( यश फार्म्स पासून साधारण ११० कि मी अंतरावर )

हरिश्चंद्रगड हा ठाणे, पुणे आणि नगर जिल्ह्यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्र डोंगर आहे. एखाद्या स्थळाचा अथवा गडाचा किती विविध प्रकारे अभ्यास करता येतो याचा सुरेख नमुना म्हणजे हरिश्चंद्रगड. या गडाचा इतिहास कुतूहलजनक तर भूगोल हा विस्मयकारक आहे.

अधिक वाचा...
images

अमृतेश्वर मंदिर ( रतनगड )( यश फार्म्स पासून साधारण १२० कि मी अंतरावर )

हेमाडपंती स्थापत्यशैलीचे पुरातन अमृतेश्वर मंदिर रतनवाडी गावात आहे. हे गाव अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहे. मंदिराच्या गर्भगृहाला मागच्या बाजूला एक अर्धमंडप आहे. मंदिराच्या रचनेत खाली थरयुक्त चौरस तळखडा असून वर नक्षीकामाने सुशोभित असे चौरसाकृती खांब आहेत.

अधिक वाचा...
images

सांधण व्हॅली ( यश फार्म्स पासून साधारण ८५ कि मी अंतरावर )

संधान व्हॅली, प्रसिद्ध किल्ला रतनगडच्या जवळ, अहमदनगर जिल्ह्यात स्थित आहे. ही भेग जवळपास ४५०-५०० फूट खोल आणि २५ फूट रुंद. केवआहातरी १० फूट देखील, आणि एक किलोमीटर लांब! हाच आहे सांधण व्हॅलीचा निसर्गनिर्मित राकट आविष्कार. ‘सांधण व्हॅली ‘ला ” द व्हॅली ऑफ शॅडो” म्हणून देखील संबोधतात.

अधिक वाचा...
images

घाटघर धरण( यश फार्म्स पासून साधारण ८५ कि मी अंतरावर )

शेंडी येथुन पश्चिमेकडे २२ किमीवर घाटघर हे निसर्गसौंदर्याने नटलेले एक गाव आहे. भंडारदरा धरणाच्या कडेकडेने घाटघरपर्यंत करावयाचा प्रवास अतिशय आनंददायी आहे. घाटघर गावचा कोकणकडा अतिशय प्रसिद्ध असुन इथुन कोकण आणि सह्याद्री पर्वताचे विलोभनीय दृश्य पहायला मिळते.

अधिक वाचा...
images

अगस्ती ऋषी आश्रम ( यश फार्म्स पासून साधारण ३५ कि मी अंतरावर )

अगस्त्य महर्षी (नामभेद: अगस्त्य, मैत्रावरुणी, अगस्ति;) हे वेद वाङ्‌मयामध्ये वर्णिलेले ‘मंत्रद्रष्टा महर्षी’ होत. ते शिवपुत्र कार्तिकेयाचे आद्य शिष्य तथा दाक्षिणात्य भक्तिपरंपरेतील मान्यताप्राप्त अठरा सिद्धपुरुषांच्यापैकी प्रथम सिद्धपुरुष मानले जातात. सप्तर्षींपैकी मुख्य मानले जाणारे भगवान श्री अगस्त्य वसिष्ठ ऋषींचे वडील बंधू होत.

अधिक वाचा...
Images

सप्तशृंगी देवी मंदिर ( यश फार्म्स पासून साधारण १३५ कि मी अंतरावर )

सप्तशृंगी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. तो नाशिक जवळील नांदुरी गावाजवळ वसलेला असून अनेक कुटुंबांची कुलदैवत असलेल्या सप्तशृंगी देवीचे तीर्थक्षेत्र आहे. हे महाराष्ट्रातील देवीच्या महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी अर्धपीठ आहे. आदिशक्तीचे मूळ स्थान आहे असे मानले जाते. देवीचे अठराभुजा सप्तशृंग रूप येथे पाहावयास मिळते.

अधिक वाचा...
Images

त्र्यंबकेश्वर मंदिर ( नाशिक, त्र्यंबकेश्वर ) ( यश फार्म्स पासून साधारण ९८ कि मी अंतरावर )

त्र्यंबकेश्वर हे नाशिक जवळचे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक हिंदू तीर्थस्थान आहे. येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. हिंदू धर्मातील वैष्णवांमध्ये दिगंबर अनी, निर्वाणी अनी आणि निर्मोही अनी असे तीन आखाडे सर्वोच्च स्थानी आहेत. याच तीन आखाड्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. शैवांचे आखाडेही त्र्यंबकेश्वरात जमतात. येथे निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिर आहे.

अधिक वाचा...